मराठी भाषेचं सौंदर्य फुलपाखरासारखं रंगीबेरंगी आहे . तिच्या या वेगवेगळ्या रंगानी आणि रूपांनी मराठी मातीत मिसळली आहे अन तिची सुगंधी दरवळ चोहोबाजूकडे पसरला आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या स्थानिक ग्रामीण बोलीतून मराठी भाषा समृद्व झाली आहे. फुलपाखरू ज्याप्रमाणे फुलांमधून रस शोषून अजून जास्त टवटवीत होतो त्याप्रमाणे अनेक भाषांमधून आलेल्या शब्दाच्या देवाणघेवाणीतून मराठी भाषा अजूनच जास्त फुलून आली आहे. मराठीची शब्दसंपदा अफाट आहे.
मराठी भाषेतले साहित्य,कादंबऱ्या, कविता या वेगवेगळ्या उत्कृष्ट लिखाणातून ती जपली आणि चिरकाल टिकलेली आहे आणि ती कायम राहणार आहे परंतु आज फुलपाखराचा निर्मितीचा पहिला टप्पा त्याचा कोष असतो त्याप्रमाणे मराठीचा कोष हा तीच लहापणी मुलांवर झालेले मराठी भाषेचं प्रेमाचे अन स्वाभिमानाचे संस्कार इंग्रजीच्या वाढत्या अतिक्रमणामुळे कुठे तरी निर्माण होणे बंद झाली आहे . तसे अजूनही इतर करणे आहेत .
मराठीचे कोष जरी कमी निर्माण होत असले तरी मराठी भाषा ही कायम हिमालयासारखी उंचचउंच आभाळ गाठत आहे नवीन तंत्रज्ञान आले म्हणून जसे आपण जुन्या परंपरा सोडत नाही तसेच कितीही भाषा शिकलो तरी मायमराठीचा स्थान कायम मनात अढळच असेल मराठी भाषा नवनवे क्षितिज ओलांडताच आहे आणि मराठी भाषिकांची एकी हीच मराठी भाषेचं चिरकाल तारुण्य टिकवून ठेवणार आहे.